27/02/202425/01/2024 by MPSCEB Share on Facebook Share on WhatsApp Share on Telegramनमस्कार मित्रांनो या लेखा मध्ये MPSC परीक्षेबद्दल सर्व माहिती (MPSC exam information in Marathi) दिलेली आहे. Contents show 1 MPSC फूल फॉर्म (MPSC full form in Marathi) 2 MPSC परीक्षेबद्दल ची माहिती (MPSC exam information in Marathi) 2.1 MPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा 2.2 MPSC पात्रता निकष (MPSC eligibility criteria) 2.3 MPSC वय मर्यादा (MPSC age limit) 2.4 MPSC परीक्षेची तयारी कशी करावी? MPSC परीक्षा ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे घेतली परीक्षा आहे. या परीक्षेतून विविध पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाते याबद्दल आम्ही MPSC पोस्ट लिस्ट या लेखात सर्व माहिती दिलेली आहे. यशस्वी उमेदवारांना आर्थिक सुरक्षा, चांगले वेतन, सामाजिक प्रतिष्ठा आणि नोकरीची आणि समाजसेवेची संधी देखील मिळते.MPSC फूल फॉर्म (MPSC full form in Marathi)MPSC चा पूर्ण फॉर्म महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) आहे. ही एक स्वायत्त आणि स्वतंत्र संस्था असून भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 अंतर्गत स्थापना झाली आहे. आयोगाचे मुख्य कार्य महाराष्ट्र राज्यातील विविध सरकारी विभागांमध्ये गट-अ आणि गट-ब पदांसाठी गुणवत्तेच्या आधारे पात्र उमेदवारांची निवड करणे हे आहे. WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now हे पद उपजिल्हाधिकारी, उपअधीक्षक (पोलीस), निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, वन अधिकारी, सहायक संचालक (शिक्षण), सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था), जिल्हा परिषद अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक मोटार वाहतूक निरीक्षक, तंत्रज्ञान अधिकारी (विविध विभाग), उप वनसंरक्षक, कृषी अधिकारी इत्यादी असू शकतात.MPSC परीक्षेबद्दल ची माहिती (MPSC exam information in Marathi) MPSC परीक्षा दोन टप्प्यांमध्ये विभाजित आहे:प्राथमिक परीक्षा: ही एक वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा असून सर्व उमेदवारांसाठी समान असते. या परीक्षेत सामान्य अभ्यास, तर्कशास्त्र आणि गणित या विषयांचा समावेश असतो. परीक्षेचे यशस्वी उतीर्ण होणे पुढील मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवते.मुख्य परीक्षा: ही एक लिखित परीक्षा असून त्यात निबंधलेख, सामान्य अभ्यास आणि निवडलेल्या पदासाठी आवश्यक विषयांचा समावेश असतो. उदा. राज्यसेवा परीक्षेसाठी मराठी लेखन, इंग्रजी लेखन, निबंधलेख, भारतीय संविधान, भारतीय अर्थव्यवस्था, इतिहास, भूगोल इत्यादी विषयांचा समावेश असू शकतो.MPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षाराज्य सेवा परीक्षा (State Service Examination)महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा (Maharashtra Agriculture Service Examination)महाराष्ट्र वन सेवा परीक्षा (Maharashtra Forest Service Examination)महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (गट-अ) परीक्षा (Maharashtra Engineering Services (Group A) Examination)महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (गट-ब) परीक्षा (Maharashtra Engineering Services (Group B) Examination)सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा (Assistant Motor Vehicle Inspector Exam)दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी (प्रथम वर्ग) स्पर्धात्मक परीक्षा (Civil Judge Judicial Magistrate (1st class) Competitive Exam)सहाय्यक अभियंता (विद्युत) (श्रेणी-2), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा (गट-ब) (Assistant Engineer (Electrical) (Gr-2), Maharashtra Electrical Engineer Service (Gr-B))पोलीस उपनिरीक्षक परीक्षा (Police Sub Inspector Examination)राज्य कर निरीक्षक परीक्षा (State Tax Inspector Examination)कर सहाय्यक (गट-क) परीक्षा (Tax Assistant Examination)सहाय्यक परीक्षा (Assistant Examination)लिपिक टंकलेखक परीक्षा (Clerk Typist Examination)MPSC पात्रता निकष (MPSC eligibility criteria)उमेदवार हा भारतीय नागरिक पाहिजे.कुठल्याही शाखेतील पदवीधर किंवा परीक्षेच्या शेवटच्या वर्षाला बसलेला उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज दाखल करू शकतो.MPSC वय मर्यादा (MPSC age limit)किमान वय मर्यादा: सर्व वर्गांसाठी 19 वर्षेजास्तीत जास्त वय मर्यादा:खुल्या वर्गासाठी: 38 वर्षेअनुसूचित जाती/जमातीसाठी: 43 वर्षेमहिला/विधवा/विकलांग/भूतपूर्व सैनिक/खेळाडू: 43 वर्षेMPSC परीक्षेची तयारी कशी करावी?MPSC परीक्षेची यशस्वी तयारी करण्यासाठी खालील टिप्स उपयुक्त ठरू शकतातअभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप समजून घ्या.संदर्भ पुस्तके आणि अभ्यास साहित्य जमा करा.नियमित अभ्यास करा आणि वेळेचे नियोजन करा.मागील वर्षीचे प्रश्नपत्रिका सोडवा.गट अभ्यास आणि मार्गदर्शन शिबिरांमध्ये सहभागी व्हा.MPSC Syllabus आणि पुस्तके यांच्यासाठी, तुम्ही खालील लिंक्सवर भेट देऊ शकता:MPSC SyllabusMPSC BooksMPSC एक्झॅम बद्दल अधिक माहिती साठी तुम्ही अधिकृत संकेत स्थळाला भेट देऊ शकता. Share on Facebook Share on WhatsApp Share on Telegram